Skip to content Skip to footer

नायर पाठोपाठ आता लोकमान्य टिळक रुग्णालयात कोरोना लसीची चाचणी

नायर पाठोपाठ आता लोकमान्य टिळक रुग्णालयात कोरोना लसीची चाचणी

संपूर्ण जगभरात धुमाकूळ घालणाऱ्या कोरोना विषाणूला रोखण्यासाठी लस हाच एक पर्याय आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील केईएम आणि नायर रुग्णालयात कोरोना लसीची चाचणी केली जात होती. त्या पाठोपाठ आता लोकमान्य टिळक अर्थात सायन रुग्णालयात १००० स्वयंसेवकांना लस टोचण्यात येणार आहे.

भारत बायोटेक कंपनीने विकसित केलेल्या ‘कोवॅक्सिन’ लसीला राज्य सरकारच्या एथिक कमिटीची परवानगी मिळाली. त्यानंतर ‘कोवॅक्सिन’ लसीच्या चाचणीला शिव रुग्णालयात सुरुवात करण्यात आली आहे, अशी माहिती रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मोहन जोशी यांनी दिली.

या लसीच्या चाचणीदरम्यान त्या लसीचा काही दुष्परिणाम होतात का? याचा सध्या अभ्यास सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेच्या केईएम आणि नायर रुग्णालयात त्याची चाचणी केली जात आहे. एकीकडे महापालिकेच्या केईएम आणि नायर रुग्णालयात कोव्हीशिल्ड लसीचा अभ्यास सुरू आहे. तर दुसरीकडे पालिकेच्या सायन रुग्णालयात भारत बायोटेकच्या कोवॅक्सिन लसीची चाचणी सुरू करण्यात आली आहे.

Leave a comment

0.0/5