Skip to content Skip to footer

कोरोनाच्या पाश्वभूमीवर मुंबईत ठाण्यात रात्रीच्या वेळी कडक संचारबंदी

कोरोनाच्या पाश्वभूमीवर मुंबईत ठाण्यात रात्रीच्या वेळी कडक संचारबंदी

ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूचा नवा प्रकार आढळून आल्यामुळे खबरदारी म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उपाययोजनांसाठी बैठक आयोजित केली होती. या बैठकित राज्यात महानगरपालिका क्षेत्रात रात्री ११ ते पहाटे सहा पर्यंत संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला असून ५ जानेवारीपर्यंत ते लागू राहील.

त्यात काही दिवसात येणाऱ्या नाताळ आणि नंव वर्षाच्या सेलिब्रेशनच्या मूडमध्ये नागरिक असल्यामुळे मोठ्या प्रमाणात गर्दी होऊन कोरोनाचा प्रसार वाढू नये म्हणून उत्साहाला आणि होणाऱ्या गर्दीला आळा घालण्यासाठीच नाईट कर्फ्यू लावण्यात आला आहे. पोलिसांनी मंगळवारी रात्रीपासून मुंबईत अनेक भागात नाकाबंदी आणि पेट्रोलिंग करत कर्फ्यूची कडक अंमलबजावणी केली.

ठाणे पोलिसांकडून कडक नाकाबंदी करण्यात येत आहे. पोलिसांकडून दुचाकी आणि चारचाकी वाहनांची कसून तपासणी करण्यात येतेय. यात दोषी आढळणाऱ्या वाहन चालकांविरोधात कारवाई करण्यात येतेय. ख्रिसमस आणि न्यू इअरच्या पार्श्वभूमीवर रात्री ११ ते पहाटे ६ पर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली

Leave a comment

0.0/5