Skip to content Skip to footer

धक्कादायक! औषध लावण्याच्या बहाण्याने तरुणीच्या गुप्तांगाला स्पर्श करत….; मुंबईत वॉर्डबॉयला अटक

तरुणी मूळव्याधावरील उपचारासाठी दाखल झाली होती

सर्जरीसाठी आलेल्या २४ वर्षीय तरुणीचा विनयभंग केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी वॉर्डबॉयला अटक केली आहे. मालाड पूर्वेतील एका खासगी रुग्णालयात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. मुकेश प्रजापती असं अटक करण्यात आलेल्या वॉर्डबॉयचं नाव आहे. आरोपी गेल्या एक वर्षापासून रुग्णालयात काम करत असून सध्या त्याला न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आलं आहे.

मूळव्याधावरील उपचारासाठी तरुणी रुग्णालयात दाखल झाली होती. ऑपरेशनच्या एक दिवस आधी वॉर्डबॉय तिच्या रुममध्ये गेला आणि औषध लावण्याच्या बहाण्याने विनयभंग केला. दिंडोशी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक प्रवीण कांबळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, “प्रजापतीने तरुणीला ऑपरेशनआधी डॉक्टरांनी औषध लावायचं आहे असं खोटं सांगितलं. आरोपीने यावेळी औषध लावण्याच्या बहाण्याने प्रायव्हेट भागाला स्पर्श केला”

ऑपरेशननंतर पीडित तरुणी आणि तिच्या कुटुंबाने आरोपीविरोधात एफआयआर दाखल केला. यानंतर पोलिसांनी आरोपी मुकेश प्रजापती याला अटक केली.

Leave a comment

0.0/5