Skip to content Skip to footer

मिशन बिगिन अगेन: वॉटरस्पोर्ट्स, नौकाविहार, अ‍ॅम्युझमेंट पार्कसह ‘या’ गोष्टी होणार सुरु

राज्य शासनाने दिली परवानगी

राज्य शासनाने मिशन बिगिन अगेन अंतर्गत पर्यटनासंबंधी आणखी काही गोष्टी खुल्या करण्यास परवानगी दिली आहे. त्यानुसार, वॉटरस्पोर्ट्स, नौकाविहार, अॅम्युझमेंट पार्क, इनडोअर गेम्स आणि कंटेन्मेंट झोनबाहेरील पर्यटन स्थळं पुन्हा सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगडमधल्या जलक्रिडा व्यावसायिकांनी काही दिवसांपूर्वी राज्याचे बंदरे मंत्री अस्लम शेख यांची त्यांच्या मंत्रालयातील दालनात जाऊन भेट घेतली. यावेळी त्यांनी जलक्रीडा (Water Sport) व्यावसायिकांच्या व्यथा मांडत या व्यवसाय पुन्हा सुरु करण्याची मागणी केली होती. अस्लम शेख यांनी शिष्टमंडळास जलक्रीडेसाठी लवकरच आदर्श कार्यप्रणाली तयार करण्याचे व राज्य सरकारचा बंदर विभाग व पर्यटन विभाग यांच्या समन्वयातून जलक्रिडा व्यवसायाशी (Water Sport) निगडीत विविध परवानग्या मिळवण्याची प्रक्रिया सोपी व सुलभ करण्याचे आश्वासन दिले होते.

दरम्यान, राज्य शासनाने सोमवारी सर्व महापालिका क्षेत्रांमध्ये रात्रीच्या संचारबंदीची घोषणा केली होती. त्यानुसार, रात्री ११ ते पहाटे ५ वाजेपर्यंत नागरिकांना घराबाहेर पडण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे. २२ डिसेंबर २०२० ते ५ जानेवारी २०२१ पर्यंत हा आदेश लागू असणार आहे. युकेमध्ये करोना विषाणूचा नवा प्रकार आढळून आल्याने राज्य शासनाने खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेतला आहे.

Leave a comment

0.0/5