Skip to content Skip to footer

नवं वर्षाच्या स्वागता निमित्त मुंबईकरांसाठी मुंबई मनपाची अनोखी भेट

नवं वर्षाच्या स्वागता निमित्त मुंबईकरांसाठी मुंबई मनपाची अनोखी भेट

ब्रिटन मध्ये नवा कोरोना विषाणू आल्यामुळे जगभरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ब्रिटनमध्ये कोरोनाचा दुसरा विषाणू आढळल्यानंतर खबरदारी म्हणून ठाकरे शासनाने नाईट कर्फ्यु करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच, नव्या कोरोनाचा प्रसार राज्यात होऊ नये यासाठी नियोजन करण्यात येत आहे.

त्यात घरातल्या पार्टीसाठी ऑनलाईन फूडची ऑर्डर देणार असाल तर ती रात्री ९.३० वाजेपर्यंतच द्यावी, रात्री ९.३० वाजेपर्यंतच्या अशा प्रकारच्या ऑर्डर स्वीकारण्याचा निर्णय आहारने घेतला असल्याचे आहारचे अध्यक्ष शिवानंद शेट्टी सांगितले आहे. मात्र आता या निर्णयामध्ये बदल करण्यात आलेला आहे.

नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून मुंबई महापालिकेने फूड डिलिव्हरीबाबतचा महत्वाचा निर्णय घेतला आहे. आज रात्री दीडवाजेपर्यंत फुल डिलिव्हरी करण्यास महापालिकेने परवानगी दिली आहे. इंडियन हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशनने (आहार )महापालिकेकडे यासंदर्भात मागणी केली होती. काल, याचा निर्णय स्पष्ट न झाल्याने आहारतर्फे साडेनऊ पर्यंतच ऑर्डर घेण्याचे जाहीर करण्यात आले. मात्र, आता महापालिकेतर्फे रात्री दीड वाजेपर्यंत फूड डिलिव्हरी करण्यास परवानगी दिली आहे.

Leave a comment

0.0/5