Skip to content Skip to footer

रायगड, बदलापूर, कर्जत-खालापूरसह खोपोलीत पावसाची जोरदार हजेरी

रायगड, कर्जत – खालापूरसह खोपोलीमध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. आज सकाळपासून ढगाळ वातावरण होते त्यानंतर जोरदार पावसाला सुरूवात झाली. या अवकाळी पावसाचा फटका शेतकऱ्यांसह परिसरातील वीटभट्टीधारकांना देखील बसला आहे. याचबरोबर बदलापूरमध्ये देखील पावसाने जोरदार हजेरी लावल्याची माहिती समोर आली आहे. तसेच, कोकण, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावासने हजेरी लावली असून, राज्यात सध्या ढगाळ वातावरण आहे.

दक्षिण मध्य अरबी समुद्रापासून मध्य महाराष्ट्रापर्यंत कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने राज्यात पावसाळी वातावरण आहे. मुंबई आणि पुण्यासह कोकण विभाग आणि मध्य महाराष्ट्रात पुढील तीन दिवस पावसाचा अंदाज हवामान विभगाने काला वर्तवला होता.

याशिवाय, मराठवाडा आणि विदर्भातही काही ठिकाणी पाऊस होणार असल्याचे सांगण्यात आले होते. दरम्यान, मागील २४ तासांत कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडय़ात काही ठिकाणी हलक्या सरींची नोंद झाली आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, कोकण विभाग आणि मध्य महाराष्ट्रात ९ जानेवारीपर्यंत पावसाळी स्थिती राहणार असून, काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस होणार आहे. मराठवाडा आणि विदर्भात ८ जानेवारीपर्यंत पावसाळी वातावरण राहण्याची शक्यता आहे.

Leave a comment

0.0/5