Skip to content Skip to footer

सोनू सूद सराईत गुन्हेगार, मुंबई महानगर पालिकेचा आरोप

सोनू सूद सराईत गुन्हेगार, मुंबई महानगर पालिकेचा आरोप

कोरोना काळात लॉकडाऊन मध्ये फसलेल्या परप्रांतीय कामगारांना आपल्या-आपल्या घरी पोहचवण्यासाठी देवदूतासारखा धावून आलेला अभिनेता सोनू सूद यांच्यावर बृहमुंबई महानगर पालिकेने गंभीर आरोप केले आहे. अनधिकृत हॉटेल उभारल्या प्रकरणी हे आरोप मनपाने त्याच्यावर केले आहे.

जुहूमधल्या एका निवासी इमारतीमध्ये अनधिकृतपणे बांधकाम करून तिथं हॉटेल थाटल्याचा आरोप करत मुंबई महापालिका प्रशासनाने बजावलेल्या नोटीसीला आता सोनूने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेत या निर्णयाला आवाहन दिले होते. त्यालाच उत्तर देताना पालिकेने हायकोर्टात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात हा आरोप केला आहे.
यात पालिकेने स्पष्ट केलं आहे की सोनू सूदने कोणताही परवाना न घेता एका निवासी इमारतीत निवासी हॉटेल सुरू करून मुंबई महापालिका कायद्याचे उल्लंघन केले आहे.

तसेच त्या इमारतीत बेकायदेशीर बदल करत एमआरटीपी कायदाही मोडला आहे. यासाठी पालिकेच्यावतीने त्याला वारंवार नोटीसही बजावून कारवाई करण्यात आली आहे. मात्र तरीही त्याचा व्यवसाय सुरूच आहे असा आरोप करताना व्यावसायिक दराने नळ जोडणी घेणंही सोनूनं आवश्यक मानलं नाही, असं महापालिकेनं सांगितलं आहे.

Leave a comment

0.0/5