Skip to content Skip to footer

IPL 2021: लिलावाआधी CSK ‘या’ दोन खेळाडूंना देणार सोडचिठ्ठी?

IPL 2020 मध्ये मुंबईच्या संघाने पाचवं विजेतेपद मिळवलं. पण सर्वाधिक चर्चा झाली ती चेन्नई संघाच्या अपयशी हंगामाची. IPL सुरू झाल्यापासून प्रथमच चेन्नईचा संघ प्ले-ऑफ्समध्येही पोहोचू शकला नाही. चेन्नईवर काही लोकांनी टीका केली. तर काही त्यांच्या पाठीशी ठामपण उभे राहिले. या साऱ्या गोंधळात आता IPL 2021साठी चेन्नईचा संघ कोणत्या खेळाडूंच्या पाठीशी ठामपणे उभी राहणार याबाबत चर्चा सुरू आहे. अशातच चेन्नईचे संघ व्यवस्थापन दोन खेळाडूंना संघातून करारमुक्त करणार असल्याची शक्यत वर्तवण्यात येत आहे.

IPL 2020मधील चेन्नईच्या धक्कादायक कामगिरीनंतर आता त्यांच्या पुढे नव्याने संघबांधणी करण्याचं मोठं आव्हान आहे. IPL 2021च्या लिलावामध्ये काही खेळाडूंना विकत घेऊन संघाची ताकद वाढवण्याचा विचार चेन्नईकडून केला जात असल्याची चर्चा आहे. नव्या खेळाडूंना संघात स्थान देण्यासाठी काही जुन्या खेळाडूंना संघाबाहेर करण्याची तयारी चेन्नईकडून सुरू असल्याचं बोललं जात आहे. त्यातही दोन अनुभवी पण चेन्नईच्या संघात नवीन असलेल्या खेळाडूंना CSK सोडचिठ्ठी देण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

फिरकीपटू पियुष चावला याला चेन्नईच्या संघातून करारमुक्त केले जाण्याची शक्यता आहे. चावला हा गेल्या वर्षीचा सर्वात महागडा भारतीय क्रिकेटपटू ठरला होता. पियुष चावलाला त्याच्या लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नाही. त्याला केवळ सात सामनेच खेळायला मिळाले आणि त्यात त्याने अवघे सहा बळी टिपले. चावलाला करारमुक्त केल्यास CSKकडे शिल्लक असलेली रक्कम वाढेल आणि त्याचा त्यांना फायदा होईल.

या यादीत दुसरे नाव म्हणजे अनुभवी सलामीवीर मुरली विजय. २०१८मध्ये त्याला CSK ने ताफ्यात नव्याने समाविष्ट करून घेतल्यानंतर पुढील तीन वर्षात त्याला फारशी चमक दाखवता आलेली नाही. IPL 2020 मध्ये त्याला तीन सामन्यात संधी देण्यात आली होती, पण त्याला फारशी चांगली कामगिरी करता आली नाही. त्यानंतर सलामीला आलेल्या ऋतुराज गायकवाड याने अप्रतिम कामगिरी संघातील आपली जागा पक्की केली. त्यामुळे विजयला संघातून करारमुक्त करण्याचा निर्णय चेन्नईसाठी सोपा असू शकतो.

Leave a comment

0.0/5