Skip to content Skip to footer

झील इन्स्टिटयूट गणतंत्र दिनानिमित्त राबवणार विविध वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम

संपूर्ण देशभरात गणतंत्र दिनाची जय्यत तयारी मोठ्या प्रमाणावर होत आहे. पुण्यातील झील शिक्षण संस्थेत ही अशाच उपक्रमांची तयारी व रंगीत तालीम करण्यात येत आहे. प्रतिवर्षी येथील विद्यार्थी आगळ्या वेगळ्या उपक्रमांमधून तसेच अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांमधून गणतंत्र दिन साजरा करतात,

मागील वर्षी सर्वात मोठ्या मानवी साखळीतून त्यांनी तिरंगा, शहीद भगत सिंह, सुखदेव, राजगुरू साकारले होते. त्यासाठी त्यांच्या नावे विक्रमाची नोंद ही करण्यात आली होती. त्याचाप्रमाणे या वर्षी भारताचा ध्वज, हिंदवी स्वराज्याचे संस्थपाक छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ, सुभेदार तानाजी मालुसरे यांचे मानवी साखळीतून पोट्रेट साकारून मानवंदना वाहणार आहेत.

नेहमीच कौतुकास्पद उपक्रम राबवून झील शिक्षण संस्थेने आपले विशिष्ट नाव जपले आहे. २५ जानेवारी सकाळी १० वाजता या कार्यक्रमाचा शुभारंभ होणार असून त्यासाठी शिक्षक व विद्यार्थी अनेक दिवसांपासून कठोर मेहनत घेत असल्याचे संस्था प्रमुखांकडून सांगण्यात आले आहेत.

Leave a comment

0.0/5