Skip to content Skip to footer

प्रजासत्ताक दिनानिमित्त ४ हजार विद्यार्थ्यांनी साकारला अनोखा कलाविष्कार…

आज पुणे येथील झील एज्युकेशन सोसायटीच्या वतीने प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून विविध सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सुमारे चार हजार विद्यार्थी विद्यार्थिनी यामध्ये सहभागी होते. संस्थेच्या माध्यमातून अनोखा कलाविष्कार सादर करण्यात आला होता ज्यामध्ये स्वराज्याचे शिल्पकार राजमाता जिजाऊ व छत्रपती शिवाजी महाराज तसेच नरवीर तानाजी मालुसरे यांची मानवी साखळीतून प्रतिमा उभारून मानवंदना दिली.

Video Source: Lokmat

https://youtu.be/DXJgWiV2R2Q

आजच्या आधुनिक जगाला व नव्या पिढीला महाराष्ट्रातील इतिहासाबद्दल तसेच स्वराज्यातील महान कार्य करणाऱ्या थोर व्यक्तिमत्त्वांची माहिती व्हावी, त्याबद्दलचे महत्व कळावे यासाठी संस्थेने हा उपक्रम राबविला होता.यावेळी संस्थेतील अनेक शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी उत्साहाने नोंदवलेला सहभाग पाहून अनेकांनी संस्था व विद्यार्थ्यांचे कौतुकही केले.

Leave a comment

0.0/5