Skip to content Skip to footer

Wakad : रहाटणीतील सराफ दुकानदारावर गोळीबार; साडेतीन किलो सोन्याचे दागिने लुटले

एमपीसी न्यूज – रहाटणी येथील एका सराफ व्यावसायिकावर गोळीबार झाला. ही घटना आज (बुधवारी) दुपारी एकच्या सुमारास कोकणे चौक येथे घडली. यामध्ये व्यावसायिकाच्या पायाला गोळी लागली आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून आरोपीचा शोध सुरू आहे.

दिव्यांग प्रदीप मेहता (वय 24, रा. रहाटणी) असे जखमी व्यवसायिकाचे नाव आहे.

 

  • याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, रहाटणीमधील कोकणे चौकाजवळ पुणेकर ज्वेलर्स हे दुकान आहे. दुपारी एकच्या सुमारास दोघेजण दुकानात आले. त्यांनी दुकानाचे शटर आतल्या बाजूने बंद केले. त्यांनी व्यावसायिकाला बंदुकीचा धाक दाखवला आणि दुकानातील सोन्याचे दागिने चोरून नेले. चोरट्यांनी दुकानातील सीसीटीव्ही कॅमे-याचा डिव्हीआर काढून नेला.

 

यावेळी झालेल्या झटापटीत चोरट्यांनी गोळीबार केला. यामध्ये दिव्यांग यांच्या पायाला गोळी लागली. चोरट्यांनी दुकानात लावलेले आणि दुकानातील तिजोरीत ठेवलेले सुमारे साडेतीन किलो सोन्याचे दागिने चोरून नेले. दुकानात आलेल्या आरोपींसोबत आणखी आरोपी असल्याची शक्यता आहे.

दरम्यान, स्थानिक पोलीस, गुन्हे शाखा, खंडणी आणि दरोडा विरोधी पथकाचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. आरोपींचा शोध सुरू आहे.

Leave a comment

0.0/5