Skip to content Skip to footer

पुणे महापालिकेची 350 आरोग्य पथकं झोपडपट्टी भागात आरोग्य करणार तपासणी

पुणे शहर आणि जिल्ह्यात कोरोना विषाणूचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिकेच्या झोपडपट्टी आणि दाटीवाटीच्या वस्त्यांमध्ये आरोग्य तपासणीसाठी 350 पथके तयार केली असून या माध्यमातून अधिक प्रमाणात आरोग्य तपासणी होणार असल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली.

यावेळी डॉ. दीपक म्हैसेकर म्हणाले की, पुणे शहरांमध्ये मागील 10 ते 15 दिवसांपासून ज्येष्ठ नागरिक आणि ज्यांना इतर विकार आहेत. त्यामध्ये  डायबेटीस, ब्लड प्रेशर, हृदयरोग, किडनी विकार किंवा अस्थमा अशा अनेक आजारामुळे ज्येष्ठ नागरिक करोना बाधित झाल्यानंतर त्यांच्यासाठी तो जीवघेणा ठरत आहे. या पार्श्‍वभूमीवर पुणे महानगरपालिकेचे आयुक्त शेखर गायकवाड यांच्या पुढाकारातून एक चांगला उपक्रम हाती घेतला आहे.

या उपक्रमाच्या माध्यमातून झोपडपट्टी किंवा दाटीवाटीच्या वस्त्यामध्ये महापालिकेची 350 पथकं पाठविण्यात येणार आहेत. या पथकांकडे पल्सऑक्सीमीटर, थर्मोस्कॅनर देण्यात आले आहेत. या माध्यमातून अनेक आजार असलेल्या रुग्णांचा तपासणी केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Leave a comment

0.0/5