Skip to content Skip to footer

पवार अध्यक्ष असलेली संस्था, प्रश्न सोडवला ठाकरेंनी

विद्यार्थिनींचा प्रश्न ऐकून आदित्य ठाकरेंनी केवळ १० मिनिटात घेतली ऍक्शन

आज नगर येथील माउली सभागृहात युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांचा “आदित्य संवाद” कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात नगरमधील राजाभाई काळे महिला महाविद्यालयाच्या तरुणीने त्यांना एक प्रश्न विचारला. “आमच्या महाविद्यालयाच्या आवारात नगर शहरातील कचरा आणून टाकला जातो. याचा महाविद्यालयीन तरुणींच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. एवढंच नव्हे तर शहरातील मांसाहारी हॉटेलचा मांसाहारी वेस्ट सुद्धा महाविद्यालयाच्या आवारात टाकला जातो. त्यामुळे हिंस्त्र कुत्र्यांचा वावर वाढला आहे. वसतिगृहात ५०० मुली आहेत आणि कुत्र्यांची संख्या २ डझन आहे” अशी अडचण श्रद्धा नावाच्या विद्यार्थिनीने सांगितली. यावर आदित्य ठाकरे “तुमचं महाविद्यालय येथून किती लांब आहे, पोहोचायला किती वेळ लागेल?” असा प्रश्न त्या तरुणीला विचारला. यावर “महाविद्यालय १० मिनिटांच्या अंतरावर आहे” असं उत्तर येताच आदित्य ठाकरे यांनी मी पर्यावरणमंत्री रामदास कदम यांना घेऊन कार्यक्रम संपल्यानंतर १० मिनिटात महाविद्यालयात येईन आणि आपल्या प्रश्नावर कार्यवाही करेन असं उत्तर दिलं. यानंतर सभागृहात एकच जल्लोष आणि टाळ्यांचा कडकडाट झाला.

१०

कार्यक्रम संपताच आदित्य ठाकरे या राजाभाई काळे महाविद्यालयात दाखल झाले. हा प्रश्न मांडणाऱ्या महाविद्यालयीन विद्यार्थिनींसोबत एकाच गाडीतून आदित्य ठाकरे परिसराची पाहणी करण्यासाठी दाखल झाले. त्यांच्यासोबत पर्यावरणमंत्री रामदास कदम सुद्धा उपस्थित होते. त्यांनी सदर पाहणी करून लवकरात लवकर हा प्रश्न सोडवण्यासंबंधी कार्यवाही करण्याचे आदेश संबंधितांना दिले.

पवार अध्यक्ष असलेली संस्था, प्रश्न सोडवला ठाकरेंनी

सदर महाविद्यालय हे रयत शिक्षण संस्थेचे असल्याची माहिती आहे. सदर शिक्षणसंस्थेचे अध्यक्षपद हे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याकडे आहे. तरीही या महाविद्यालयाची समस्या इतकी वर्षे का सोडवली गेली नाही हा प्रश्न अनुत्तरित आहे. आदित्य ठाकरेंनी मात्र हि समस्या समजताच केवळ १० मिनिटात ती सोडवण्यासाठी ऍक्शन घेतल्याने संस्था पवारांची,प्रश्न सोडवला ठाकरेंनी अशी चर्चा नगर परिसरात रंगली आहे.

 

आदित्य ठाकरेंची जादू:जन आशीर्वाद दौऱ्याला “मनसे” शुभेच्छा

1 Comment

  • अशोक जनार्दन कुबल , कल्याणपुर्व ..
    Posted July 26, 2019 at 5:16 pm

    अदित्त साहेब अपले अपन जे शिवसेनेच्या माध्यमातून जन सेवेचे काम चालु केले आहे .ते धनुश बानाचा जो तिर त्या पध्दतीने आहे.हे सर्व शिवसेना प्रमुख मा.श्री. बाळासाहेब ठाकरे याचे आशिर्वाद आहे.खर म्हणजे समोरचा मानुस अपल्याला काहितरी सांगत आहे .आणि त्याचे म्हणेन आपण ऐकुन घेत आहात तेच सर्वात मोठे काम आहे.आणि त्याचे म्हणेन ऐकुन घेतल्यावर ते काम आपन त्वरित करीत आहेत.यालाच कामांची पध्दत बोलतात.अशीच कामाची पध्दत राहीली तर आपला भारत देश व आपला महाराष्ट्र काही हट्टाने पुढे जाईल .पण त्या साठी आपल्या सारखे हुशार चाणक्य तडबदार युवा या महाराष्ट्राला गरज आहे.आपल्याला शुभेच्छा…

Leave a comment

0.0/5