Skip to content Skip to footer

“प्रश्न समजला, जागच्या जागी सोडवला” असणार नवी ठाकरी शैली?

 

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे त्यांच्या वक्तृत्वामुळे एकमेवाद्वितीय ठरले तसेच त्यांच्या आदेश देण्याच्या ठाकरी शैली मुळेही. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे संयमी आक्रमक नेते म्हणून ओळखले जातात. राजकारणातील विरोधकांविषयी भाषणात न बोलता निवडणुकीत मात्र त्यांचा काटा अलगद बाजूला सारण्याची किमया उद्धव ठाकरेंनी करून दाखवली आहे. युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या माध्यमातून शिवसेनेत नवं नेतृत्व उभं राहतंय. बाळासाहेबांची नेतृत्व आणि लेखन आणि वक्तृत्वशैली ही ठाकरी शैली म्हणून ओळखली जाते. उद्धव ठाकरेंनी त्यात थोडा संयम टाकून ती कायम ठेवली. त्यामुळे आता आदित्य ठाकरे नेमकं कसं काम करणार याची सर्वांनाच उत्सुकता होती. आदित्य ठाकरेंच्या जन आशीर्वाद दौऱ्याचा पहिला टप्पा काल पार पडला. या दौऱ्यात त्यांना भेटून निवेदन देणाऱ्यांच्या प्रश्नांवर त्यांनी जागच्या जागी कार्यवाही सुरु करून समस्या सोडवण्याचे आदेश दिले. हे चित्र संपूर्ण दौऱ्यादरम्यान दिसलं. त्यामुळे “प्रश्न समजला, जागच्या जागी सोडवला” ही आदित्य ठाकरेंची कार्यशैली नवी ठाकरी शैली म्हणून ओळखली जाऊ शकते.

शुभारंभ

आदित्य ठाकरेंनी अनेक वर्षे रखडलेल्या समस्या सोडवण्यासाठी आणि प्रकल्प मार्गी लावण्यासाठी देण्यात आलेली निवेदनं लवकरात लवकर निकाली काढण्याची मोहीम हाती घेतली आहे. ते निवेदन स्वीकारतानाच “या प्रश्नाबाबत मला जे काही करता येईल ते मी नक्की करेन” असं सांगून निवेदन स्वीकारतात. शिवाय निवेदन देणाऱ्यांना आणि मागणी करणाऱ्यांना खोटी आश्वासनं देण्याचा मोह टाळतात. मोठ्या मोठ्या घोषणा करण्याऐवजी थेट तो प्रश्न सोडवूनच त्याबद्दल बोलतात. त्यांच्या या कार्यशैलीची अनेक उदाहरण अलीकडच्या काळातच पाहायला मिळतील. आदित्य ठाकरेंच्या या कार्यशैलीमुळे अनेकांना “नायक” चित्रपटातील अनिल कपूर यांनी साकारलेल्या “मुख्यमंत्री” पात्राची आठवण झाली आहे. मात्र तो शेवटी चित्रपट होता. आदित्य ठाकरे जे काम करतात ते वास्तव आहे. त्यामुळे महाराष्ट्राला असा मुख्यमंत्री मिळाला पाहिजे अशी भावना आता व्यक्त होताना दिसते. शिवाय आदित्य ठाकरे कोणत्याही सरकारी पदावर नसताना अशी कामं करू शकतात तर ते मुख्यमंत्री झाल्यावर महाराष्ट्राचा विकास नक्कीच करतील अशी चर्चा आता महाराष्ट्राची जनता करताना दिसते.

गेल्या सहा महिन्यात आदित्य ठाकरेंनी कोणती प्रमुख रखडलेली कामे तात्काळ मार्गी लावली आहेत यावर एक नजर:

१) सोलापूर येथीलआष्टी सिंचन प्रकल्प जवळपास गेल्या २५ वर्षांपासून रखडलेला होता. फेब्रुवारी महिन्यात आदित्य ठाकरेंना याबद्दल निवेदन देताच त्यांनी चर्च दिवसात काम सुरु केलं. या प्रकल्पाचं भूमिपूजन नुकतंच आदित्य ठाकरेंच्या हस्ते पार पडलं आहे.

२) जालना येथील रुग्णालय अर्धवट बांधून झालेलं होतं. सदर कामास नऊ कोटींचा निधी कमी पडतोय आणि एक हॉस्पिटल १०० ऐवजी २०० खाटांचं करून हवं आहे अशी मागणी तेथील लोकांनी आदित्य ठाकरेंकडे केली. यावर आदित्य ठाकरे यांनी रखडलेला नऊ कोटींचा निधी आठ दिवसात मिळवून दिला आणि १०० खाटांचे हॉस्पिटल २०० नव्हे तर ३०० खाटांचे करण्याचं काम सुरू केलं.

३) नाशिक येथे जन आशीर्वाद दौऱ्यादरम्यान आदित्य ठाकरेंचं भाषण सुरु असताना एका शेतकऱ्याने ओरडून “गावात आरोग्य केंद्र दवाखाना नाही” असं सांगितलं. यावर आदित्य ठाकरेंनी “आठ दिवसात आरोग्य केंद्राचं काम सुरु करतो” असं उत्तर दिलं.

१०

४) धुळे येथे “आदित्य संवाद” कार्यक्रमात एका महाविद्यालयाच्या विद्यार्थिनीने “गावातील कचरा आणि नॉनव्हेज हॉटेलचा कचरा महाविद्यालय परिसरात टाकला जातो त्यामुळे हिंस्त्र कुत्र्यांचा त्रास होतो तसेच आरोग्यावर परिणाम होतो” अशी समस्या मांडली. यावर आदित्य ठाकरेंनी “तुमचं महाविद्यालय इथून किती अंतरावर आहे, जायला किती वेळ लागेल?” असं विचारलं. महाविद्यालय १० मिनिटांच्या अंतरावर असल्याचं समजताच आदित्य ठाकरे स्वतः १० मिनिटात संबंधित परिसराच्या पाहणीसाठी दाखल झाले आणि केवळ २० मिनिटात त्यांच्या आदेशाने परिसर स्वच्छतेस सुरुवात झाली.

५) याच कार्यक्रमात एका आजीबाईंनी “मी गेल्या साडेचार वर्षात मंत्रालयात ५०-६० चकरा मारल्या तरी माझं पेन्शनचं काम होत नाही. विनोद तावडेंना भेटूनही काम झालं नाही. तुम्ही माझ्या मुलासमान आहात. मी पात्र असून मला पेन्शन मिळत नाही. तुमच्याकडून अपेक्षा आहे. तुम्ही काम करा” असं सांगताच आदित्य ठाकरेंनी “तुम्हाला मंत्रालयात यावं लागणार नाही. मी इथेच तुमचं काम करून देतो. आज रात्रीपर्यंत हे काम मार्गी लावतो” असं सांगितलं. यावर त्या आजीबाईंनी हात जोडून आदित्य ठाकरेंना नमस्कार केला.

आजीबाईंनी

एकूणच आदित्य ठाकरेंच्या या कार्यशैलीबाबत महाराष्ट्रात सध्या जोरदार चर्चा असून जनतेत कुतूहलसुद्धा आहे.आगामी काळात जन आशीर्वाद दौऱ्याचे पाच टप्पे पार पडणार असून आदित्य ठाकरेंची ही ठाकरी शैली कार्यपद्धती महाराष्ट्रभर दिसल्यास आगामी विधानसभेत शिवसेनेला याचा प्रचंड फायदा होऊ शकतो. विशेषतः तरुण मतदारांना शिवसेनेकडे ओढण्यासाठी हा मुद्दा शिवसेनेला पुरेसा ठरेल. याउलट “अभ्यास करू आणि निर्णय घेऊ” अशी इमेज असलेल्या देवेंद्र फडणवीसांना याचा जबरदस्त फटका बसू शकतो. यामुळे भाजपच्या गोटात चलबिचल सुरु झाल्याचीही चर्चा आहे.

आदित्य ठाकरेंकडून १ लाख २५ हजार वह्यांचे वाटप

4 Comments

 • my little pony coloring Pages
  Posted October 20, 2019 at 11:47 am

  We’re very happy to host an ABC Yoga for Kids yearly competition that permits children to enter
  it with the yoga coloring pages they filled out from our internet site.

 • rules of survival hack download
  Posted November 23, 2019 at 8:17 pm

  whoah this blog is wonderful i really like reading your articles.
  Keep up the good work! You understand, lots of people are searching round for this information, you could help them greatly.

 • Iris
  Posted January 21, 2020 at 5:20 am

  I enjoy what you guys tend to be up too. https://cavm-ombc.ca

Leave a comment

0.0/5