Skip to content Skip to footer

मतदान केंद्रावर झाले मतदारांचे शाही स्वागत

मतदान केंद्रावर झाले मतदारांचे शाही स्वागत
राज्यात सर्वत्र २८८ जागेसाठी मतदान होत आहे. सकाळी सात वाजल्यापासूनच मतदारांनी घराच्या बाहेर पडून मतदानाचा हक्क बजावत आहे. त्यातच निवडणूक आयोगाने सुद्धा अनेक उपक्रम राबविले आहे. मुंबईतल्या भायखळा येथील मतदान केंद्राबाहेर अतीशय सुंदर रांगोळ्या काढण्यात आल्या आहेत. तर मतदान केंद्राच्या प्रवेश व्दारावर फुग्यांची सजावट करण्यात आली आहे.

त्याचप्रमाणे विदर्भातल्या यवतमाळमध्ये मतदारांचं औक्षण करून त्याचं स्वागत करण्यात आलं. महिला मतदारासाठी विशेष सखी मतदान केंद्रेही सजवण्यात आल्यामुळे हे मतदान केंद्र मतदारांचं आकर्षण ठरलं आहे. राज्यातल्या अनेक शहरांमध्येही अशाच प्रकारे मतदानकेंद्र सजविण्यात आले आहेत.

यवतमाळ शहरातील नगर परिषदच्या संजय गांधी शाळेच्या मतदान केंद्रावर प्रशासनाच्यवतीने तहसीलदार रुपाली बेहरे यांनी मतदारांचे औक्षण करून आणि गुलाब पुष्प देऊन त्यांचं स्वागत केलं. यावेळी त्यांना कापडी पिशवी ही देण्यात आली. या केंद्रावर एक सेल्फी पॉइंट सुद्धा तयार करण्यात आला असून पंख आहे. या माध्यमातून जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करावे आणि मतदानाची टक्केवारी वाढावी असा त्यामागचा दुहेरी उद्देश आहे.

Leave a comment

0.0/5