Skip to content Skip to footer

शरद पवारांनी आदिवासी पाड्यात घेतला जेवणाचा आस्वाद

शरद पवारांनी आदिवासी पाड्यात घेतला जेवणाचा आस्वाद

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार नुकतेच शहापूरच्या दौऱ्यावर गेले होते. शहापुरमधील दौऱ्याचापाडा येथे एका भुमीपूजनाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने शरद पवार यांना निमंत्रित करण्यात आले होते. यावेळी त्यांच्यासोबत गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाडदेखील उपस्थित होते. शरद पवार यांनी कार्यक्रम आटोपल्यानंतर तेथील आदिवासी पाड्यातील एका झोपडीत जेवणाचा आस्वाद घेतला. जितेंद्र आव्हाड यांनी झोपडीत जेवतानाचा फोटो शेअर केला असून या नेत्याला काय म्हणावे…अशी भावना व्यक्त केली आहे.

शहापूर तालुक्यातील दौऱ्याचापाडा येथे जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या वतीने कर्करोगग्रस्तांसाठी मल्टिस्पेशालिटी रुग्णालय व उच्च दर्जाचे शिक्षण देणारे विद्या संकुल उभारण्यात येत आहे. शरद पवार यांच्या हस्ते भुमीपूजन सोहळा पार पडला. शरद पवार यांनी यावेळी प्राथमिक शाळेत भेट देऊन तेथील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. जितेंद्र आव्हाड यांनी फेसबुकवर जेवताना फोटो पोस्ट करताना लिहिलं आहे की, “या नेत्याला काय म्हणावे…कुडाची झोपडी…आदिवासी मावशीने केलेला स्वयंपाक…तांदळाची भाकरी… भाजलेला कोंबड्याच्या रस्सा… कनटोरल्याची भाजी…आणि साहेब जेवता आहेत…संस्मरणीय दिवस”

Leave a comment

0.0/5