Skip to content Skip to footer

बुलेट ट्रेनच्या मुद्यावरून मुख्यमंत्र्यांनी भाजपावर साधला निशाणा

बुलेट ट्रेनच्या मुद्यावरून मुख्यमंत्र्यांनी भाजपावर साधला निशाणा

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामानाला दिलेल्या आपल्या मुलाखतीत अनेक प्रश्नांची रोकठोक उत्तरे दिली. प्रदीर्घ चाललेल्या या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी भाजपाच्या विविध मुद्यावर आणि शिवसेनेवर लागवलेल्या आरोपांचा खरपूस समाचार घेतला. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी ट्रेनवरूनही भाजपावर निशाणा साधला. बुलेट ट्रेन महाराष्ट्रात येणार की नाही?,” असा प्रश्न संजय राऊत यांनी विचारला.

याबाबत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, ‘सरकारचं काम विकास करणं आहे. बरोबर आहे… अलीकडेच मी मंत्रालयातून व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे नागपूर मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याचं उद्घाटन केले. कामे सुरू आहेत हेही खर आहे की. काही प्रकल्पांना मी स्थगिती दिली आहे. जरूर दिली आहे,’ असे ठाकरे म्हणाले.

पुढे बोलताना ठाकरे म्हणाले की, ‘मला नेहमी असं वाटतं की, पैशाचा जो मघाशी विषय निघाला त्या आर्थिक परिस्थितीकडे बघून राज्याच्या विकासाची प्राथमिकता ठरवली पाहिजे. आताच्या आता काय ताबडतोबीनं गरजेचं आहे. नुसतं आपल्याला कोण बिनव्याजी म्हणा, किंवा कमी दरानं कर्ज देतोय म्हणून ते अंगावरती घ्यायचं आणि गरज नसताना शेतकऱ्यांच्या जमिनी पण काढायच्या पुन्हा हे जे पांढरे हत्ती आहेत ते पोसायचे, हे काही योग्य नाही,’ असे ठाकरे म्हणाले. दरम्यान, ‘मुख्यमंत्र्यांनी ‘बुलेट ट्रेनबद्दलसुद्धा मला असं वाटतं की याच्यावरती सगळय़ांच्या सोबत बसून विचार व्हायला पाहिजे असे देखील यावेळी मुख्यमंत्र्यांनी बोलून दाखविले.

Leave a comment

0.0/5