Skip to content Skip to footer

मुस्लीम संघटनांनी केला पठाणचा निषेध, शीर कलम करणाऱ्याला जाहीर केले ११ लाखाचे बक्षीस

एनसीआर आणि सीआरआर कायदयविरोधात देशभरात वादंग निर्माण झालेले आहे. कायदयविरोधात अनेक ठिकाणी जागो-जागी आंदोलने उभारली जात आहे. एमआयएम पक्षाचे नेते आणि भायखळा मतदारसंघाचे माजी आमदार वारिस पठाण यांनी एका सभेत बोलताना, ‘आपल्याला स्वातंत्र्य मिळवायचे असून ते मागून मिळत नसते, तर हिसकावून घ्यायचे असते. आता फक्त मुस्लीम महिला पुढे आल्या, तर तुम्हाला घाम फुटला. आपणही सोबत आलो, तर काय होईल? आपण १५ कोटी असून १०० कोटींना भारी पडू, असे चिथावणीखोर वक्तव्य पठाण यांनी केले होते.

या वक्तव्यानंतर संपूर्ण देशभरातून पठाण याच्या विरोधात संतापाची लाट पसरलेली होती. तर अनेक संघटनांनी जाहीर निषेध व्यक्त केला होता. आता त्यापाठोपाठ मुस्लीम संघटनांनी सुद्धा पठाण विरोधात आंदोलन केले आहे. तसेच पठाण विरोधात मुस्लीम संघटनाही आक्रमक झाल्या असून पठाण यांचे शीर कलम करणाऱ्याला या संघटनेकडून बक्षीस जाहीर कऱण्यात आले आहे.

वारिस पठाण यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ शुक्रवारी बिहारमधील मुजफ्फरपूर येथे हिंदू आणि मुस्लीम संघटनांनी आंदोलन केले. पठाण यांच्या वक्तव्यावर अनेक मुस्लीम संघटनांनी नाराजी व्यक्त केली आहे. तर मुजफ्फरपूर येथील अल्पसंख्यांक सामाजिक संघटनेने वारिस पठाण यांचे शीर कलम करणाऱ्याला ११ लाख रुपयांचे बक्षीस ठेवले आहे. दरम्यान पठाण यांच्याविरोधात कारणात येथे पोलीस केस करण्यात आली असून त्यांच्यावर कलम ११७, १५३ आणि कलम १५३ ए अशा गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

Leave a comment

0.0/5