Skip to content Skip to footer

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना ही मिळणार आधार – ठाकरे सरकार च्या योजनेतून मिळणार दिलासा.

महाविकास आघाडीने शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून सुरु केलेल्या महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेत महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. अतिवृष्टीमुळे कर्जाचा भार असलेल्या शेतकऱ्यांना देखील या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी ठाकरे सरकार तर्फे प्रक्रिया राबविली जाणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.

 

याबाबतीत बोलत असताना ते म्हणाले की, या योजनेतून अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना देखील कर्जमुक्त करण्याचा विचार राज्य सरकार मार्फत केला जात असून, याबाबतीत लवकरच निर्णय घेण्यात येईल. या कर्जमाफीसाठी सप्टेंबर २०१९ हे कट ऑफ डेट होती. तसेच या योजनेतील लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये हे पैसे जमा केले जाणार आहे.

Leave a comment

0.0/5