Skip to content Skip to footer

लातूरमधल्या ‘त्या’ कोरोनाबाधितांच्या ट्रॅव्हल हिस्ट्रीने वाढवली बीडकरांची धाकधूक

देशात सर्वत्र लॉकडाऊन असताना आणि जमावबंदीचा आदेश लागू असताना 2 एप्रिल रोजी मध्यरात्री लातूर जिल्ह्याच्या सीमा ओलांडून तबलिगी जमातचे काही सदस्य लातूर जिल्ह्यातील निलंगा येथे पोहोचले होते यापैकी आठ यात्रेकरू कोरोनाग्रस्त असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. मात्र, त्यांच्या ट्रॅव्हल हिस्ट्रीमुळे बीडकरांची धाकधूक वाढली आहे.
चेकपोस्टवर पोलिसांशी घातली होती हुज्जत…

लातूरला जाणाऱ्या तबलिगी जमातच्या काही जणांनी बीड जिल्ह्यातील शहागड येथील चेकपोस्टवर पोलिसांशी हुज्जत घातली होती. तेथील पोलिस अधिकाऱ्यांशी त्यांनी बाचाबाची केली होती, अशी माहिती समोर आली आहे. दरम्यान, पहाटे पोलिसांची नजर चुकवून तबलिगी जमातच्या सदस्यांनी नागझरीमार्गे लातूर गाठले होते.

आता हुज्जत घातलेल्या बीडच्या पोलिसांचे स्वॅबही तपासले जाणार आहे. तब्बल 10 दहा पोलिसांचे स्वॅब नमूने घेतले जाणार आहेत. त्यामुळे आरोग्य प्रशासन आणि पोलिसाचं टेन्शन वाढलं आहे. खबरदारी म्हणून बीड प्रशासनाने चेकपोस्टवरील काही पोलिस, आरोग्य विभाग, महसूल विभाग, जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्या  त येणार आहे.

उच्चस्तरीय चौकशी होणार?

देशात लॉकडाऊनच्या काळात यात्रेकरूंना निलंगा येथील मशिदीमध्ये आश्रय देण्यात आला होता. खरेतर असे अनोळखी व्यक्ती आढळून येताच याची माहिती संबंधितांनी पोलिस, जिल्हा प्रशासन किंवा जिल्हाधिकाऱ्यांना तातडीने द्यावयास हवी होती. याप्रकरणी मशीद आणि मशिदीचे कार्यवाह यांनी कायद्याचे उल्लंघन केल्याने उच्चस्तरीय चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असेही पालकमंत्री अमित देशमुख यांनी म्हटले आहे. या प्रकारामुळे जिल्ह्यातील सर्वच निष्पाप नागरिकांना धोका निर्माण करण्याचा प्रकार पुढे आला आहे. या घटनेची कठोर शब्दात निंदा करीत असल्याचे सांगून यापुढे जिल्ह्यात असे प्रकार घडू नयेत यासाठी प्रत्येकाने कायद्याचे कठोर पालन करावे, असे आवाहनही पालकमंत्र्यांनी केले आहे.

Leave a comment

0.0/5