Skip to content Skip to footer

CMO च्या ट्विटमध्ये औरंगाबादचा ‘संभाजीनगर’ असा उल्लेख!

CMO च्या ट्विटमध्ये औरंगाबादचा ‘संभाजीनगर’ असा उल्लेख!

सध्या राज्यात औरंगाबादचे संभाजीनगर नामांतर मुद्यावरून राजकारण चांगलेच तापू लागले आहे. त्यात आज CMO च्या ट्विटर हँडलवर औरंगाबादचा ‘संभाजीनगर’ असा उल्लेख करण्यात आला आहे. यामुळे आता नामांतराचा मुद्दा लवकरच मार्गी लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

आज CMO च्या ट्विटमध्ये काँग्रेस नेते व वैद्यकीय शिक्षण सांसकृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांच्या खात्याबाबत घेण्यात आलेल्या निर्णयाची माहिती देण्यासाठी, करण्यात आलेल्या ट्वटिमध्ये औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर असा करण्यात आलेला आहे.

तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी केंद्राला पात्र पाठवून औरंगाबाद विमानतळाचे “छत्रपती संभाजी महाराज विमानतळ” असे नामकरण करण्यात यावे अशा आशयाचे पत्रं केंद्राला पाठवले आहे. तसेच मंत्रिमंडळाच्या बैठकीत औरंगाबादच्या विमानतळाला छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव देण्याबाबत राज्याच्या मंत्रिमंडळाने निर्णय घेतला आहे.

Leave a comment

0.0/5