Skip to content Skip to footer

“तरुणांच्या संकल्पनांना चालना देणार!” – मंत्री आदित्य ठाकरे

“तरुणांच्या संकल्पनांना चालना देणार!” – मंत्री आदित्य ठाकरे

कोरोनाच्या वाढत्या संकटात देशात मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढलेली आहे. अनेकांना आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागल्या आहेत. यातच आता मागच्या तीन-चार महिन्यांपासून बंद असलेल्या पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी महाराष्ट्र विकास महामंडळाने इंटर्नशिप कार्यक्रम सुरू करणार आहे.

या कार्यक्रमा अंतर्गत इंटर्नना सोशल मीडिया बिझनेस डेव्हलपमेंट, एचआर, आयटी अशा वेगवेगळ्या शाखांमध्ये काम करण्याची संधी मिळणार आहे. तसेच एमटीडीसीच्या अधिपत्याखाली असलेल्या रिसॉर्ट, ॲडव्हेंचर पार्क, डायव्हींग संस्था इत्यादींच्या विकासासाठी आपल्या कल्पना मांडता येतील. तसेच विकास प्रक्रियेतही सहभाग घेता येईल.

या संकल्पनेबद्दल सांगताना पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे म्हणाले की, ‘महाराष्ट्राच्या पर्यटनाला चालना देण्यासाठी विविध उपक्रम राबवित आहोत. यात युवकांच्या नवकल्पनांचीही आवश्यकता आहे’. एमटीडीसीसोबत महाराष्ट्राचे पर्यटन पुनरुज्जीवित करण्यासाठी आणि महाराष्ट्राचे पर्यटन वैभव संपूर्ण विश्वाला दाखवण्यासाठी या कार्यक्रमात तरुणांनी सहभागी व्हावे, असे आवाहन देखील त्यांनी केले आहे.

Leave a comment

0.0/5