Skip to content Skip to footer

कोरोनाच्या संकटात ऑफलाईन कार्डधारकांना रेशनचे धान्य द्या – विनायक राऊत

कोरोनाच्या संकटात ऑफलाईन कार्डधारकांना रेशनचे धान्य द्या – विनायक राऊत

राज्यात नाही तर संपूर्ण देशात कोरोना आजाराने हाहाकार माजवला आहे. त्यातच राज्यात 21 दिवसाच्या लॉकडाऊनच्या घोषणेमुळे अनेकांचे खाण्याचे अतोनात हाल झालेले दिसून येत होते.

याच पार्श्वभूमीवर लॉकडाऊनच्या काळात राज्यासह देशातील सर्व राज्यातील ऑफलाईन कार्डधारकांनाही रेशनचे धान्य- साखर निःशुल्क किंवा माफक दरात द्या, अशी मागणी शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी केली आहे.

याबात खासदार विनायक राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि खाद्य व सार्वजनिक वितरणमंत्री रामविलास पासवान यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, केंद्र सरकारने सर्व कार्डधारकांना २०१८ पर्यंत त्यांचे कार्ड ऑनलाईन रजिस्टर करण्यास सांगितले होते.

पण नेटवर्कची सोय नसणे, कामगारांनी बाहेरगावी राहणे अशा काही कारणांमुळे अनेक कार्डधारक त्यांचे कार्ड ऑनलाईन करू शकले नाहीत, आता लॉकडाऊनच्या काळात त्यांना रेशनचे धान्य मिळत नाही, त्यांची अडचण दूर करा असे पत्रात नमूद केले आहे.

Leave a comment

0.0/5