Skip to content Skip to footer

कोरोनाचा मुंबई पुण्यातील आलेख खाली आणायचाय – मुख्यमंत्री

कोरोनाचा मुंबई पुण्यातील आलेख खाली आणायचाय – मुख्यमंत्री

कोरोनाच्या रुग्णांवरती करण्यात येणाऱ्या उपचार पद्धती तसेच गंभीर परिस्थितीत असलेल्या रुग्णांना कसे वाचवायचे अशा अनेक वैद्यकीय मुद्द्यांवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे मुंबईतील प्रमुख कॉर्पोरेट रुग्णालयांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी चर्चा केली. यावेळी नुकत्याच स्थापन झालेल्या टास्क फोर्सचे डॉक्टर्स देखील या व्हिडिओ कॉन्फरन्स मध्ये सहभागी झाले होते. त्यांनीदेखील त्यांचे विचार मांडले.

या व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे झालेल्या बैठकीत सैफी, फोर्टिस, वोकहार्ट, हिंदुजा, हिरानंदानी,कोकिलाबेन, सेव्हन हिल्स त्याचप्रमाणे मुख्य सचिव अजोय मेहता, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, सचिव सौरव विजय, सुरेश काकाणी, अश्विनी भिडे, रामास्वामी, डॉ संजय ओक आदी उपस्थित होते. उपचार सुरू असताना रुग्णाची कशी काळजी घ्यायची, वैदयकीय उपकरणे, बेडची व्यवस्था या सर्व महत्वपूर्ण बाबीवर सविस्तर चर्चा झाली.

Leave a comment

0.0/5