Skip to content Skip to footer

सारीने वाढवले साऱ्या शहराचे टेंशन – औरंगाबादेत सारी बाधितांमध्ये चार रुग्णांची वाढ

सारीने वाढवले साऱ्या शहराचे टेंशन – औरंगाबादेत सारी बाधितांमध्ये चार रुग्णांची वाढ

सध्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कोरोनामुळे चिंतेचे वातावरण पसरलेले असताना औरंगाबाद मध्ये मात्र सध्या वेगळंच चित्र पाहायला मिळत आहे. औरंगाबादमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत असतानाच सारीचे देखील रुग्ण झपाट्याने वाढत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. औरंगाबादमध्ये सारीचे २३८ पैकी २१७ अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

औरंगाबादमध्ये संभ्रम वाढत औरंगाबाद हे महाराष्ट्रातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे हॉटस्पॉट जाहीर करण्यात आले असून, आता सारीच्या वाढत्या थैमानामुळे जात आहे. प्रशासन तसेच वैद्यकीय विभाग वेळोवेळी सूचना करत असूनही अशाप्रकारे संसर्ग वाढत आहे व त्यामुळेच शहरातील धोकादायक पातळी वाढली असल्याचे आरोग्य विभागातर्फे सांगण्यात आले आहे. तसेच कोरोनाच्या चिंतेमुळे प्रत्येक रुग्णाची स्वॅब चाचणी देखील करण्यात येत आहे.

Leave a comment

0.0/5