Skip to content Skip to footer

कोरोनाच्या सर्व चाचण्या निःशुल्क करण्याचा राज्य सरकारचा निर्णय

कोरोनाच्या सर्व चाचण्या निःशुल्क करण्याचा राज्य सरकारचा निर्णय

राज्यात वाढत आलेल्या कोरोना रुग्णाच्या संख्येमूळे चाचण्या वाढवण्याचा निर्णय आरोग्य मंत्र्यांनी घेतला होता. त्याच पाठोपाठ आता वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या शासकीय वैद्यकीय तसेच दंत महाविद्यालयांमध्ये व रुग्णालयांमध्ये यासंदर्भातील सर्व चाचण्या आणि उपचार मोफत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अशी माहिती वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी आज येथे दिली.

वर्ल्ड हेल्थ संघटनेकडून कोरोना हा संसर्ग आजार असल्याचे घोषित करण्यात आले होते. राज्यात या आजाराच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे हे विचारात घेऊन वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव विभागाच्या अखत्यारीतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, दंत महाविद्यालय व रुग्णालयांमध्ये कोविड-१९ संदर्भातील रुग्णांच्या सर्व तपासण्या व उपचार यापुढे नि:शुल्क करण्यात आले आहेत. कोविड -१९ ग्रस्त रुग्णांना सुलभतेने उपचार घेता यावेत व यावर उपचार घेण्यासाठी अधिकाधिक रुग्णांनी पुढे यावे या दृष्टीने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.

Leave a comment

0.0/5