Skip to content Skip to footer

मंत्री धनुभाऊंचे कार्यकर्त्यांना भावनिक आवाहन….!

मंत्री धनुभाऊंचे कार्यकर्त्यांना भावनिक आवाहन….!

सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांना करोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाल्यावर चिंतेत असलेले कार्यकर्ते आपल्या नेत्याच्या प्रकृतीसाठी उपवास, नवस वगैरे करत आहेत. मुंडे यांनी या सर्व कार्यकर्त्यांना भावनिक आवाहन केले आहे. ‘मी बरा आहे. काळजी करू नका,’ असे त्यांनी कार्यकर्त्यांना सांगितलं आहे

कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निदान झाल्यानंतर धनंजय मुंडे मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार घेत आहेत. मात्र, त्यांच्या प्रकृतीमुळे काळजी कार्यकर्त्यांना लागून राहिली आहे. त्यामुळेच मुंडे यांना बरं वाटावे म्हणून कार्यकर्ते देवाकडं नवस करीत आहेत. काही जण उपवासही करीत आहेत. धनंजय मुंडे यांना दीर्घायुष्य लाभावं यासाठी औरंगाबादमधील त्यांच्या एका निस्सीम चाहत्यांना भगवानगडावर जाऊन भगवान बाबांना साकडं घालण्याचं ठरवलं आहे. त्यासाठी तो हाती मशाल घेऊन धावत भगवान गडावर जाणार आहे. रोज ५० किलोमीटर धावण्याचं लक्ष्य त्यानं ठेवलं आहे.

Leave a comment

0.0/5