Skip to content Skip to footer

एसटी महामंडळाची मुंबई ते गोवा बस सेवा सुरु, पर्यटकांना दिलासा

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागच्या सात महिन्यांपासून बंद असलेली एसटीची सेवा आता पूर्ण क्षमतेने सुरु झालेली आहे. त्यातच मुंबईतून गोवा येथे पर्यटनासाठी जाणाऱ्या पर्यटकांसाठी एसटीने नवीन वर्षाच्या तोंडावर मुंबई ते पणजी अशा नव्या एसटी बसची घोषणा केली आहे.

नाताळाच्या पार्श्वभूमीवर येत्या ९ डिसेंबर पासून मुंबई सेंट्रल ते पणजी एसटी बस सेवा सुरु केली जाणार आहे. मुंबईकडून गोव्याकडे जाणाऱ्या प्रवाशांसाठी ही बससेवा लाभदायक ठरणार आहे. या बसमध्ये आसन आणि शयन सीट अशी दोन्ही व्यवस्था असणार आहे. त्यामुळे प्रवाशांनी आधीच बुकिंग केल्यास त्यांना आरक्षित सीट मिळू शकते.

मुंबईतून ही बस चिपळूण, कणकवली, सावंतवाडी आणि म्हापसा मार्गे पणजीमध्ये दाखल होईल. मुंबई येथून सायंकाळी ४:३० वाजता तर पणजी येथून सायंकाळी ४:०० वाजता ही बस सुटेल. तसेच या बसच्या आरक्षणासाठी अधिक माहिती एसटी महामंडळाच्या संकेत स्थळावर सुद्धा उपलब्ध आहे.

Leave a comment

0.0/5