Skip to content Skip to footer

महाराष्ट्र ऑफीसर्स फोरमकडून मुख्यमंत्री निधीला ७ लाखाची मदत !

महाराष्ट्र ऑफीसर्स फोरमकडून मुख्यमंत्री निधीला ७ लाखाची मदत !

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी आरोग्य विभाग आणि राज्य शासनाचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. या प्रयत्नांना पाठबळ देण्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधीत योगदान देण्याच्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून दानशूर व्यक्ती व संस्था, संघटनाकडून निधी देण्याचे सामाजिक कार्य सुरु आहे. तसेच विविध कंपन्यांनी वैद्यकीय साहित्याच्या रुपात सहाय्यता निधीला हातभार लावल्याचेही प्रसंग पाहावयास मिळाले आहे.

याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र ऑफीसर्स फोरमने ७ लाखांचा धनादेश मुख्यमंत्री सहायता निधीसाठी शुक्रवारी उर्जामंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांच्याकडे सुपूर्द केला. महाराष्ट्र ऑफीसर्स फोरमने समाजिक दायित्वाच्या भूमिकेतून हे कार्य केले आहे. यावेळी विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार, जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे, महाराष्ट्र ऑफीसर्स फोरमचे पदाधिकारी सचिव शिवदास वासे, उपाध्यक्ष टी. बी. देवतळे, कोषाध्यक्ष विलास सुटे, विभागीय सचिव अशोक गेडाम, प्राचार्य सच्चिदानंद दारूंडे, जिल्हा सचिव धर्मेश फुसाटे व ऊर्जा मंत्र्याचे विशेष कार्याधिकारी ललीत खोब्रागडे प्रामुख्याने उपस्थित होते.

Leave a comment

0.0/5