Skip to content Skip to footer

संजय कुमार राज्याचे नवे मुख्य सचिव.

संजय कुमार राज्याचे नवे मुख्य सचिव.

संजय कुमार यांची राज्याच्या मुख्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. विद्यमान मुख्य सचिव अजोय मेहता हे ३० जून रोजी सेवानिवृत्त होत आहेत. त्यानंतर संजय कुमार हे राज्याच्या मुख्य सचिवपदाचा कारभार हातात घेणार आहेत. सध्या संजय कुमार हे गृहनिर्माण विभागाचे अपर मुख्य सचिव आहेत. गृह विभागाचा अतिरिक्त कार्यभारही त्यांच्याकडे आहे.

दरम्यान सध्याचे मुख्य सचिव अजोय मेहता १ जुलैपासून मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार म्हणून जबाबदारी सांभाळणार आहेत. कोविडच्या पार्श्वभूमीवर राज्याची आर्थिक, प्रशासकीय, यंत्रणा परत वेगाने सुरू करण्यासाठी व्यापक आणि दीर्घ अनुभव असणाऱ्या व्यक्तीची मुख्यमंत्री सचिवालयात नितांत आवश्यकता असल्यामुळे अजोय मेहता यांना निवृत्तीनंतर प्रधान सल्लागार हे पद देण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला आहे.

Leave a comment

0.0/5