Skip to content Skip to footer

राज्यातील प्रमुख मोठ्या शहरांमध्ये झोपड्पट्टी पुर्नवसन योजना लागू करणार – मुख्यमंत्री

राज्यातील प्रमुख मोठ्या शहरांमध्ये झोपड्पट्टी पुर्नवसन योजना लागू करणार – मुख्यमंत्री

राज्यातील सर्वसामान्य जनतेला आपल्या आवाक्यात परवडणारी घरे उपलब्ध करून देण्यासाठी राज्यातील मोठ्या शहरांमध्ये तसेच महानगर पालिका क्षेत्रांमध्ये झोपडपट्टी बहुत भागात झोपडपट्टी पुर्नवसन योजना लागू करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतलेला आहे.

मुंबई महानगर वगळता उर्वरित एमएमआरडीए क्षेत्रातील झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरण मुंबई महानगर वगळता मुंबई क्षेत्रातील महानगरपालिका आणि नगरपालिका यांसाठी स्वतंत्र झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाची स्थापना करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला आहे. तसेहच रखडलेल्या झोपडपट्टी पुर्नवसन योजनेसाठी निधी उपलब्ध करून देण्यासंदर्भात सुद्धा आज बैठकीत चर्चा होऊन निर्णय घेण्यात आला आहे.

या रखडलेल्या झोपडपट्टी पुर्नवसन प्रकल्पासाठी लागणार निधी उपलब्ध करण्यासाठी स्ट्रेस फंडच्या माध्यमातून झोपडपट्टी पुनर्वसन योजनांमधील पुनर्वसन सदनिकांच्या बांधकामासाठी बँकांकडून विकासकाला कर्ज उपलब्ध होऊन प्रकल्पाला गती मिळणार आहे.

Leave a comment

0.0/5