Skip to content Skip to footer

१० वी आणि १२ वी निकाला संदर्भात शिक्षण मंत्र्यांची माहिती…

१० वी आणि १२ वी निकाला संदर्भात शिक्षण मंत्र्यांची माहिती…

कोरोनाच्या वाढत्या संकटात दहावी आणि बारावीचा निकाल केव्हा लागणार या बाबत विध्यार्थी वर्ग चिंतेत होता. मात्र या बाबत शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी निकाल केव्हा लागणार या बाबत माहिती दिलेली आहे.

दहावीचा निकाल ३१ जुलैपर्यंत तर बारावीचा निकाल १५ ते २० जुलैपर्यंत लागणार असल्याचं त्यांनी सांगितलं. हिंगोली दौऱ्यावर असताना पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी ही माहिती दिली आहे.

कोरोनाचा वाढत्या प्रादुर्भावाचा फटका हा शैक्षणिक क्षेत्राला देखील बसला आहे. विद्यार्थी हे निकालाची वाट पाहत असून, उशिरा लागलेल्या निकालामुळे व कोरोनाचा वाढता धोका बघता पुढील प्रवेश देखील लांबणार आहेत. राज्यातील नऊ विभागांचा निकाल या एकत्रित जाहीर केला जातो. मात्र, मुंबई, ठाणे, पुणे येथील लक्षणीय कोरोना रुग्णांच्या संख्येमुळे पेपर तपासणीच्या कामाला उशीर झाला आहे.

Leave a comment

0.0/5