Skip to content Skip to footer

शेतकऱ्यांना समृद्ध आणि चिंतामुक्त करण्यासाठी शासन कटिबद्ध ! – कृषिमंत्री दादाजी भुसे.

शेतकऱ्यांना समृद्ध आणि चिंतामुक्त करण्यासाठी शासन कटिबद्ध ! – कृषिमंत्री दादाजी भुसे.

शेतकऱ्यांनी पिकविलेला माल, प्रक्रिया केलेला माल तसेच हा माल ग्राहकांपर्यंत पोहचविण्याचे काम फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून उभे केले जाणार आहे. ‘मा. बाळासाहेब ठाकरे स्मार्ट योजने’द्वारे शेतकऱ्यांना सबसिडी देण्यात येईल. त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी एकत्र यावे, गटशेती करावी तसेच फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या माध्यतातून विकासाकडे वाटचाल करावी, असे आवाहन राज्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी केले.

नाशिक जिल्हा बँकेला सुमारे ८७० कोटींचा निधी कर्जमुक्ती योजनेच्या अनुषंगाने वर्ग करण्यात आलेला आहे व याच निधीतून शेतकऱ्यांना पीककर्जाचा पुरवठा करण्याचे निर्देशही जिल्हा बँकांना देण्यात आल्याने ‘महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजनेला’ आता गती मिळेल. तसेच मक्याच्या पिकावरील लष्करी अळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कृषी विभाग सक्षम असून, तशा उपाययोजना राबविण्यासाठी कृषी विभागाला सूचना देण्यात आल्याचे मंत्री दादा भुसे यांनी सांगितले.

अर्लीद्राक्षाच्या संदर्भातील प्रश्नांवर येत्या आठवड्याभरात जाणकार व निर्यातदारांसोबत बैठक घेवून प्रश्न निकाली काढण्यात येणार आहे. तसेच केंद्राच्या मार्गदर्शक सूचनेनुसार पीक विमा संदर्भातील विमा ऐच्छिक करण्यात आला आहे व तशी मुभा शेतकऱ्यांना देण्यात आलेली आहे. कृषी विभागाच्या सर्व योजनांचा लाभ आता शेतकऱ्यांना घरबसल्या ऑनलाईन पद्धतीने घेता येणार आहे. यासाठी एकच नमुन्यातील अर्ज राहणार असून, या ऑनलाईन प्रक्रियेमुळे सर्व योजनांमध्ये पारदर्शीपणा येणार असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.

Leave a comment

0.0/5