Skip to content Skip to footer

केंद्राकडून येणं ३८ हजार कोटी रुपये आहे, पण मिळालेले नाहीत! – मुख्यमंत्री

केंद्राकडून येणं ३८ हजार कोटी रुपये आहे, पण मिळालेले नाहीत! – मुख्यमंत्री

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्यासंदर्भात आज वर्षा शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. या बैठकीत अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी ठाकरे सरकारने १० कोटी रुपयाची आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेतलेला आहे. याची घोषणा खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषदेत केली.

तसेच यावेळी पत्रकारांनी केंद्राकडून येणाऱ्या मदतीविषयी मुख्यमंत्र्यांना विचारले असता यावर मुख्यमंत्री म्हणाले की, सध्या राज्यात कोरोनाचे संकट असताना केंद्राने पीपीई किट, एन ९५ मास्कचा पुरवठा बंद केला आहे. तसेच जिएसटीच्या परताव्याचे पैसे अद्याप केंद्राने दिलेले नाही. त्यामुळे विरोधक या टीका करताय त्यापेक्षा आपण महाराष्ट्रावर आलेल्या संकटाशी सर्वानी एकत्रितपणे लढा दिला पाहिजे, असे मुख्यमंत्री ठाकरे यांनी बोलून दाखविले होते.

Leave a comment

0.0/5