Skip to content Skip to footer

‘या’ महिन्यात येणार लस? आणि इतकी असेल त्याची किंमत

‘या’ महिन्यात येणार लस? आणि इतकी असेल त्याची किंमत

सध्या संपूर्ण जगभरात कोरोनाच्या संसर्गाने थैमान घातले आहे. त्यात काही राज्यांमध्ये कोरोनाचा संसर्ग आटोक्यात येताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी दिलासादायक बातमी दिलेली आहे.

आरोग्य कर्मचारी आणि ज्येष्ठ व्यक्तींसाठी कोरोनाची ही लस फेब्रुवारी २०२१ पर्यंत आणि सर्वसामान्य जनतेसाठी एप्रिलपर्यंत बाजारात येईल, अशी माहिती मंत्री हर्षवर्धन यांनी दिली आहे. त्यामुळे केंद्रीय मंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार पुढील येत्या चार-पाच महिन्यात भारतात कोरोनाची लस उपलब्ध होणार आहे. यासाठी केंद्र सरकारने आतापासून तयारी सुरु केली आहे.

या लसीच्या किमतीबद्दल बोलताना ते म्हणाले की, ५०० ते १००० रुपयांना कोरोना लसीचे दोन डोस उपलब्ध होणार आहेत. हिंदुस्तान टाईम्स लीडरशीप समीटमध्ये बोलताना केलेल्या वक्तव्यानुसार २०२४ पर्यंत अंदाजे प्रत्येक भारतीय नागरिकाला कोरोनाची लस मिळालेली असेल, अशी माहिती त्यांनी दिली.

Leave a comment

0.0/5