Skip to content Skip to footer

संजय राऊत यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ग , कमी बोलण्याचा डॉक्टरांचा सल्ला

संजय राऊत यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ग , कमी बोलण्याचा डॉक्टरांचा सल्ला

अँजिओप्लास्टीनंतर शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांना आज लिलावती हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला. पुढचे काही दिवस त्यांना विश्रांती आणि कमी बोलण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिलेला आहे.

डिस्चार्ग घेऊन बाहेर पडल्यावर उपस्थित असलेल्या पत्रकार माध्यमांनी त्यांना गराडा घातला त्यावेळी डॉक्टरांनी जास्त न बोलण्याचा सल्ला दिला आहे असे त्यांनी वक्त्यव्य यावेळी केले होते. काही तणाव आहेत, बेफिकरीपणाने राहतो. यापुढे सर्वच पथ्यपाणी नीट पाळणार आहे. पुन्हा रुग्णालयात जाण्याची वेळ येऊ नये असा प्रयत्न करणार आहे, असे त्यांनी यावेळी बोलून दाखविले.

पुढे बोलताना ते म्हणाले की, मागील वेळी शस्रक्रिया झाली होती, पण काही गोष्टी राहिल्या होत्या. कोव्हिडमुळे उपचार होऊ शकले नाहीत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हे लक्षात आल्यानंतर त्यांनी तातडीने हे सर्व करून घ्यायला सांगितले असे त्यांनी सांगितले.

Leave a comment

0.0/5