Skip to content Skip to footer

आरक्षणाच्या मुद्यांवरून मराठा आणि ओबीसी समाजाला खुश करण्यासाठी आघाडी सरकारची कोट्यवधीची तरतूद

आरक्षणाच्या मुद्यांवरून मराठा आणि ओबीसी समाजाला खुश करण्यासाठी आघाडी सरकारची कोट्यवधीची तरतूद

सध्या आरक्षणाच्या मुद्यावरून मराठा आणि ओबीसीए समाज आघाडी सरकारवर नाराज आहे. या दोन्ही समाजाला खुश करण्यासाठी आघाडी सरकारने काही महत्वाचे निर्णय घेतले आहे. आज विधानसभेत २१ हजार ९९ कोटी रुपयांच्या पुरवण्या मागण्या सादर करण्यात आल्या असून त्यात ओबीसी समाजाच्या महाज्योती संस्थेसाठी ८१ कोटींची तर मराठा समाजाच्या सारथी संस्थेसाठी ११ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. कुठेतरी आरक्षणाच्या मुद्यावर नाराज झालेल्या दोन्ही समाजाला खुश करण्यासाठी सरकारने हे पाऊल उचलले आहे.

राज्य सरकारने आज विधानसभेत सादर केलेल्या पुरवणी मागण्यांमध्ये दोन्ही समाजासाठी भरीव तरतूद केली आहे. ओबीसींच्या महाज्योती संस्थेसाठी ८१ कोटींची तर मराठा समाजाच्या सारथी संस्थेसाठी 11 कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

त्याच प्रमाणे ओबीसी विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीसाठी ११ कोटींच्या भरीव निधीची तरतूद करण्यात आली आहे. भटक्या जमाती, विमुक्त जमातींच्या आश्रम शाळांसाठी २१६ कोटींचीही तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे या दोन्ही समाजाच्या शैक्षणिक प्रगतीस हातभार लागणार असल्याचा विश्वास सरकारकडून व्यक्त करण्यात आला आहे.

Leave a comment

0.0/5