Skip to content Skip to footer

गारपिटीचा औरंगाबाद जिल्ह्यात फटका बसण्याची शक्यता

गारपिटीचा औरंगाबाद जिल्ह्यात फटका बसण्याची शक्यता

मागील तीन ते चार दिवसांपासून वातावरणातील सुरु असलेला बदल पुढील ४८ तास म्हणजेच आणखी दोन दिवस कायम राहणार आहे. तसेच अरबी समुद्रातील सक्रिय असलेल्या चक्रीवादळाचा परिणाम औरंगाबाद जिल्ह्यावरही होत आहे. त्यामुळे दोन दिवसात काही जिल्ह्यांतील काही भागांमध्ये गारपिटीची शक्यता
हवामान तज्ज्ञानी वर्तवली आहे. त्यानुसार औरंगाबादेतही गारपीटीची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
डिसेंबर महिना सुरु असूनही राज्यात अपेक्षित गारवा अद्याप सुरु झालेला नाही.

अरबी समुद्रात बुरवी चक्रीवादळ निर्माण झाले होते. याचा परिणाम महाराष्ट्रातही झाला आहे. अपेक्षित थंडी यामुळे गायब झाली असून पुढील 48 तास वातावरणातील हा बदल कायम राहणार असल्याची माहिती एमजीएम हवामान केंद्राचे प्रमुख हवामानतज्ज्ञ डॉ. श्रीनिवास औंधकर यांनी दिली आहे. अरबी समुद्रावरील या वादळाच्या परिणामी राज्यात औरंगाबादसह काही जिल्ह्यात थंडी गायब होऊन रात्रीच्या तापमानात वाढ झाल्याचे चित्र आहे. वातावरण ढगाळ झाले आहे. मात्र थंडीचा जोर दिसून येत नाही. पुढील २ दिवस हे ढगाळ वातावरण कायम राहणार आहे. राज्यातील जळगाव, धुळेसह उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, औरंगाबादमध्ये ढगाळ वातावरण असेच कायम राहील. अरबी समुद्रात सक्रिय असलेल्या बुरवी चक्रीवादळाचा हा परिणाम असून कमी दाबाच्या पट्यामुळे वातावरणात हे बदल झाले असल्याचे डॉ. औंधकर यांनी सांगितले.

Leave a comment

0.0/5