Skip to content Skip to footer

अंबाबाई मंदिरातील दुकानदारांकडून देवस्थान समिती कोषाध्यक्षा वैशाली क्षीरसागर यांचा सत्कार

अंबाबाई मंदिरातील दुकानदारांकडून देवस्थान समिती कोषाध्यक्षा वैशाली क्षीरसागर यांचा सत्कार

कोरोनाच्या संकट काळात गेली आठ महिने बंद कोल्हापूरची अंबाबाई मंदिराचे द्वार बंद होते. त्यामुळे श्री अंबाबाई मंदिरातील दुकानेही बंद करण्यात आली होती. गेल्या महिन्यापासून श्री अंबाबाई मंदिर दर्शनाची मर्यादित वेळ ठरवून भाविकांसाठी खुले केले. परंतु, मंदिर आवारातील दुकाने बंद ठेवण्यात आली होती.

याबाबत संबधित दुकानदारांनी दुकाने उघडण्यास अनुमती द्यावी, अशी मागणी देवस्थान समितीच्या कोषाध्यक्षा वैशाली क्षीरसागर यांची भेट घेवून करण्यात आली होती. त्यानुसार वैशाली क्षीरसागर यांनी नववर्षाच्या प्रारंभी श्री अंबाबाई मंदिर उघडताना आतील दुकानदारांनाही दुकाने सुरु करण्यास परवानगी द्यावी, यासाठी देवस्थान समितीच्या बैठकीत यशस्वी पाठपुरावा केला होता.

या पाठपुराव्याला यश आले असून देवस्थान समितीने नववर्षाच्या प्रारंभी शुक्रवार १ जानेवारी २०२१ पासून मंदिर आवारातील दुकाने उघडण्यास परवानगी दिली आहे. याबाबत मंदिर आवारातील दुकानदारांच्या शिष्ठमंडळाने आज देवस्थान समितीच्या कोषाध्यक्षा वैशाली क्षीरसागर यांची भेट घेवून त्यांचा पुष्पगुच्छ, शाल व श्रीफळ देवून सत्कार केला.

Leave a comment

0.0/5