Skip to content Skip to footer

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी लोकप्रतिनिधी बद्दल व्यक्त केली नाराजी

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी लोकप्रतिनिधी बद्दल व्यक्त केली नाराजी

केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी मराठवाड्यातल्या दोन लोकप्रतिनधींवर गंभीर स्वरूपाचे आरोप केले आहे. रस्त्यांच्या कामात मराठवाड्यातले लोकप्रतिनिधीच मोठा अडथळा आहेत. कंत्राटदारांना कामाची टक्केवारी मागतात. अशा लोकप्रतिनीधीमुळं रस्त्यांच्या कामाचा दर्जा घसरलाय. रस्ते वेळेत पुर्ण होत नाहीत, अशी नाराजी गडकरी यांनी जाहीरपणे व्यक्त केली. गंभीर बाब अशी की औरंगाबादच्या बैठकीत गडकरींना कंत्राटदारांनी थेट काही लोकप्रतिनिधींची नावच सांगितली.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या समोर उस्मानाबाद जिल्ह्यातील १०० कोटींच्या एका रस्त्याचा विषय आला. कंत्राटदारांने लोकप्रतिनिधी दोन टक्क्याप्रमाणं दोन कोटी मागत असल्याचा बैठकीत आरोप केला. नव्हे पैसे दिल्याशिवाय कामच सुरू करू देत नाही, असं गडकरींना सांगितलं. त्यावर गडकरींनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. नितिन गडकरींच्या कानपिचक्यांमुळं वातावरण तापलं आहे. पण या कार्यक्रमाच्या आठ दिवस आधीच भाजपाचे दोन लोकप्रतिनिधी रस्ते कामातल्या टक्केवारीवरुनंच एकमेकांशी भिडले होते.

Leave a comment

0.0/5