Skip to content Skip to footer

एक कोटीचा टप्पा पार; भारताचा रिकव्हरी रेट जगात सर्वाधिक

कोविड-१९ आजारातून बरे होणाऱ्या भारतातील रुग्णांचं प्रमाण जगात सर्वाधिक असून भारताचा रिकव्हरी रेट ९६.३६ टक्क्यांवर पोहोचला आहे. त्याचबरोबर या बरे होणाऱ्या रुग्णांनी १ कोटीचा टप्पाही पार केला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी ही माहिती दिली.

ताज्या डेटा नुसार, “गेल्या २४ तासांत भारतात १९,५८७ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. त्याचबरोबर १,००,१६,८५९ रुग्ण बरे झाले आहेत. त्यामुळे भारताचा राष्ट्रीय रिकव्हरी रेट ९६.३६ टक्के झाला आहे. जो जगात सर्वाधिक आहे. सध्याच्या अॅक्टिव्ह रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण ४४ पटींनी जास्त आहे. सध्या देशात एकूण पॉझिटिव्ह रुग्णांचे प्रमाण २,३८,०८३ इतके असून जे २.१९ टक्के इतकं आहे.

भारतात करोनाच्या संसर्गाच्या प्रमाणात दररोज सातत्याने घट होत असून दररोज साधारण ३ टक्क्यांनी पॉझिटिव्हिटी रेट कमी होत आहे. महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तमिळनाडू आणि केरळ या राज्यांतून एकूण ५१ टक्के बरे झालेल्या रुग्णांचं प्रमाण आहे.

Leave a comment

0.0/5