Skip to content Skip to footer

हेमंत नगराळे यांच्याकडे राज्याच्या पोलीस महासंचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार

हेमंत नगराळे यांच्याकडे राज्याच्या पोलीस महासंचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार

सुबोधकुमार जयस्वाल यांना केंद्रात नियुक्ती मिळाल्यानंतर राज्याला नवीन पोलीस महासंचालक कोण मिळणार यावरच चर्चा रंगली होती. मात्र, आता महाराष्ट्र राज्याच्या पोलिस महासंचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार हेमंत नगराळे यांच्याकड़े सोपवण्यात येणार आहे. आज दुपारी ३.०० वाजता नागराळे महासंचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार स्विकारणार आहेत.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार महाविकास आघाडी सरकार पोलीस महासंचालकपदी एका मराठी चेहर्‍याला पसंती मिळू शकते. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे दोघे मिळूनच अंतिम निर्णय घेणार होते. मात्र, सध्यातरी हेमंत नगराळे यांच्या नावाला शरद पवारांची पसंती मिळली आहे. त्यामुळे त्यांच्याकड़े राज्याच्या सुरक्षेची जबाबदारीचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे.

Leave a comment

0.0/5