Skip to content Skip to footer

शेतकरी कृषी कायद्याला पाठिंबा देणारे खासदार नारायण राणे सोशल मीडियावर ट्रोल

कृषी विधेयकांच्या समर्थनार्थ कणकवली येथे माजी मुख्यमंत्री, खासदार नारायण राणे, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, आमदार रविंद्र चव्हाण आणि आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत भव्य ट्रॅक्टर रॅली काढण्यात आली होती.

यावेळी बोलताना भाजप नेते आणि खासदार नारायण राणे यांनी कृषी कायद्याला पाठिंबा दर्शवत शिवसेना आणि काँग्रेस पक्षावर जोरदार टीका केली होती, दिल्ली सुरू असलेलं आंदोलन राजकीय आहे. राहुल गांधींना शेतीतलं काय कळतं. ते काय बोलतात हे त्यांना कळतं का? राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देत आहेत, त्यांना शेतीतलं काय कळतं? असा सवाल राणे यांनी केला होता.

मात्र राणेंच्या कृषी समर्थनावरून नेटकऱ्यांनी चांगलाच टोला लगावला. राणे यांनी या रॅलीचे फोटो फेसबूकवर अपलोड केले आहेत. त्यावर अनेक लोकांनी कमेंट करत राणेंची खिल्ली उडवली आहे. “सर तुमचा ट्रॅक्टर चालवताना एक फोटो हवा होता, पाय पोहचतो का नाही ब्रेकवर ते समजलं असतं”,” शेतकऱ्यांच्या नावाखाली भाजपा भक्तांचे फोटो टाकण्याची पद्धत जुनीच आहे”,” काय फायदा रैली काढून मोदी नालायक माणूस आहे १०० % तो देश विकणार” अशा शब्दात नेटकऱ्यांनी समाचार घेतला आहे.

Leave a comment

0.0/5