केंद्राच्या निष्कर्षापेक्षा वाढीव मदत राज्य सरकारने दिलेली आहे – मुख्यमंत्री
राज्यमंत्रीमंडळाची विशेष व महत्वपूर्ण बैठक आज वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी पार पडली. नुकसानग्रस्त भागातील पाहणीचा आढावा यावेळी घेण्यात आला. अतिवृष्टीने शेतकऱ्यांचं मोठे नुकसान झाले होते, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्री मंडळाच्या यावेळी सांगितले.
केंद्राकडून राज्याचे हक्काचे ३० हजार ८०० कोटी येणे बाकी आहेत तरी देखील अतिवृष्टीने नुकसान झाले आहे त्या शेतकऱ्यांसाठी १० हजार कोटींची मदत हे सरकार जाहीर करत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी पत्रकार परिषदेत सांगितले.
यात यापूर्वी केंद्राचे जे मदतीचे निकष होते, त्यात जेवढी रक्कम दिली जात होती, त्यापेक्षा जास्त मदत आपण शेतकऱ्यांना करत आहोत, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे. यापूर्वी केंद्राकडून जिरायत व बागायती क्षेत्रासाठी ६ हजार ८०० रू. प्रति हेक्टर मदत मिळत होती. आता तीच १० हजार रूपये प्रति हेक्टर भरपाई दिली जाणार आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितले.