Skip to content Skip to footer

शेतमाल मुल्य साखळ्यांचा विकास करणाऱ्या ‘स्मार्ट’ प्रकल्पामध्ये राज्यातील सर्व विभागांना प्रतिनिधित्व मिळावे – दादा भुसे

शेतमाल मुल्य साखळ्यांचा विकास करणाऱ्या ‘स्मार्ट’ प्रकल्पामध्ये राज्यातील सर्व विभागांना प्रतिनिधित्व मिळावे – दादा भुसे

शेतमालाच्या सर्व समावेशक मुल्य साखळ्यांचा विकास करण्यासाठी मा.बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्पाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना लाभ मिळाला पाहिजे. या योजनेतून राज्यातील सर्व विभागांना प्रतिनिधीत्व मिळाले पाहिजे अशा सूचना कृषी मंत्री दादा भुसे यांनी आज मंत्रालयात घेतलेल्या आढावा बैठकीत दिल्या आहेत.

या प्रकल्पासाठी अर्ज करण्याकरिता पोर्टल सुरु करण्यात आले आहे त्यानुसार ११ हजार ५८४ लोकांनी नोंदणी केली असून ५ हजार ७६४ संस्थांनी अर्ज सादर केले आहेत. यामध्ये सुमारे २ हजार शेतकरी उत्पादक कंपन्या असून २ हजार ८३३ आत्मा नोंदणीकृत गट आहेत अशी महिती कृषी मंत्र्यांनी दिली.

महाराष्ट्र ग्रामीण जीवनोन्नती अभियानातील प्रभाग संघांचे ७१० तर माविमच्या लोकसंचालित साधन केंद्राचे २६२ अर्ज प्राप्त झाले आहेत. शेतकऱ्यांच्या हितासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून ‘विकेल ते पिकेल’ अभियान सुरु करण्यात आले असून या अंतर्गत या प्रकल्पाच्या माध्यमातून मुल्य साखळ्यांचा विकास सुरु केला जाणार आहे.

Leave a comment

0.0/5