Skip to content Skip to footer

जलवाहतुकीच्या अत्याधुनिक प्रणालीचे केंद्रीय मंत्री गडकरी यांना सादरीकरण

अलाहाबाद-वाराणसी आणि दिल्ली ते आग्रा अशी एरोबोट लवकरच सुरू करण्यात येत असल्याचे गडकरी यांनी सांगितले. प्रकल्पाला आवश्यक मंजुऱ्या वगळल्यास यात सरकारचा कुठलाही सहभाग नाही. वाहतुकीच्या आधुनिक प्रणालीची माहिती केंद्रीय मंत्र्यांना देण्यासाठी हे सादरीकरण करण्यात आले. कोराडी येथील तलावाजवळ सहा एकर जमीन खरेदी करण्यात आली आहे. येत्या दीड वर्षात टप्प्याटप्प्याने हा प्रकल्प पूर्ण होईल. पहिल्या टप्प्यात चार तयार बोट बोलावण्यात येतील. दुसऱ्या टप्प्यात बोटची उभारणी येथे करण्यात येईल. कोराडी येथे तिसऱ्या टप्प्यात उत्पादन, संशोधन व प्रशिक्षण देण्यात येईल, असे अतुल शिरोडकर यांनी स्पष्ट केले.

येत्या १० नोव्हेंबरपासून गंगा नदीतून अलाहाबाद-वारासणी अशी सेवा सुरू करण्याचे कंपनीचे प्रयत्न आहे. ही कल्पना अतिशय चांगली असून कानपूरपर्यंत गंगा नदीत दोन हजार बोट चालू शकता. सहा महिन्यात एअरोबोटचा प्रकल्प कार्यान्वित झाल्यानंतर इंडो-रशियनची ‘कॅबलाईन’ ही अत्याधुनिक रोपवे सेवा सुरू करण्यात येईल, असेही अतुल शिरोडकर यांनी सांगितले.

Leave a comment

0.0/5