Skip to content Skip to footer

गृहमंत्री शहांना पदावरून हटवा, काँग्रेस पक्षाची राष्ट्रपतींकडे मागणी

दिल्ली येथे घडलेल्या हिंसाचाराच्या प्रकरणामुळे साऱ्या देशात असंतोषाचे वातावरण निर्माण झालेले आहे. तसेच केंद्रातील सरकारवर सुद्धा जोरदार टीका होत आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग तसेच काँग्रेसच्या जेष्ठ नेत्यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली. यावर आपण केंद्र सरकराने आपल्या राजधर्मासाचे पालन करावे, या मागणीसाठी आपण भेट घेतल्याचे सोनिया गांधी यांनी सांगितले आहे.

दिल्लीत राजधर्माचे पालन केले गेले नाही. अमित शहा हे केंद्रिय गृहमंत्री म्हणून दिल्लीची परिस्थिती हातळण्यात अपयशी ठरले आहेत, म्हणून त्यांनी तात्काळ गृहमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी सोनिया गांधी यांनी राष्ट्रपतींकडे केली आहे. दिल्ली हिंसाचारात मृत्युमुखी पडलेल्या कुटुंबियांच्या दुखा:त मी आणि संपूर्ण काँग्रेस पक्ष सामिल आहे, असेही सोनिया म्हणाल्या. तर केंद्र सरकारने आपला राजधर्म पाळण्याबाबत अधिक काळजी घ्यायला पाहिजे होती, असे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग म्हणाले आहेत.

Leave a comment

0.0/5