Skip to content Skip to footer

भाजप खासदाराची घसरली जीभ, परदेशी महिलेच्या पोटी जन्मलेला व्यक्ती देशभक्त होऊ शकत नाही….!

भाजप खासदाराची घसरली जीभ, परदेशी महिलेच्या पोटी जन्मलेला व्यक्ती देशभक्त होऊ शकत नाही….!

सध्या चीनच्या मुद्यावरून भाजपा आणि काँग्रेस मध्ये शाब्दिक चकमक पाहायला मिळत आहे. याच मुद्द्यावरून पुन्हा एकदा भाजपा खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर ह्यांनी अत्यंत खालच्या पातळीची टीका काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्यावर केली आहे. प्रज्ञासिंह ठाकूर यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर टीका करताना परदेशी महिलेच्या पोटी जन्मलेली व्यक्ती देशभक्त असू शकत नाही, असे वक्तव्य केले आहे. चाणक्य यांनी फक्त भुमिपूत्रच आपल्या मातृभूमीचे रक्षण करु शकतो असं सांगितलं होतं, असंही त्या म्हणाल्या आहेत. त्यामुळे काँग्रेस आणि भाजपातील वाद आता वाढण्याची शक्यता आहे.

भोपाळमध्ये कार्यकर्त्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर बोलताना प्रज्ञासिंह ठाकूर यांनी हे वक्तव्य केले होते. प्रज्ञासिंह ठाकूर यांनी राहुल गांधींसोबत सोनिया गांधी यांच्यावरही निशाणा साधला आहे. काँग्रेसमध्ये ना सभ्यता आहे ना संस्कार आहेत. दोन देशांचं नागरिकत्व असलेल्यांकडून आपण देशभक्तीची अपेक्षा करु शकत नाही, असं म्हणत प्रज्ञासिंह ठाकूर यांनी राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले आहे.

Leave a comment

0.0/5