Skip to content Skip to footer

“अयोध्या आणि शिवसेनेचं जुनं नातं आहे” – संजय राऊत.

“अयोध्या आणि शिवसेनेचं जुनं नातं आहे” – संजय राऊत.

सर्व संकटांवर मात करत अखेर प्रभू श्री रामाच्या जन्मभूमीच्या उद्घाटनची तारीख जाहीर झालेली आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना बोलावण्यात येणार का? यावरून अनेक तर्क-वितर्क लावले जात होते. मात्र यावर आता खासदार संजय राऊत यांनी भाष्य केले आहे. उद्धव ठाकरेंना अयोध्येला जाण्यासाठी निमंत्रणाची गरज नाही. अयोध्या आणि शिवसेनेचे जुनं नातं असून ते राजकीय नाही. राजकारणासाठी आम्ही अयोध्येला जात नाही आणि गेलो नाही असं वक्तव्य राऊत यांनी केले आहे.

अयोध्येचा रस्ता शिवसेनेने तयार केला आहे असंही त्यांनी यावेळी बोलून दाखविले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिराचे भूमिपूजन होणार असून यासाठी उद्धव ठाकरेंना निमंत्रण दिलं आहे का ? या प्रश्नावर बोलताना त्यांनी हे उत्तर दिलं. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला राम जन्मभूमीच्या बांधकामाच्या निर्णयावरून सर्वत्र आनंदाचे वातावरण आहे, असे सुद्धा बोलून दाखविले.

Leave a comment

0.0/5