Skip to content Skip to footer

हाथरस प्रकरण : योगी आदित्यनाथ यांनी राजीनामा द्यावा, काँग्रेसची मागणी.

हाथरस प्रकरण : योगी आदित्यनाथ यांनी राजीनामा द्यावा, काँग्रेसची मागणी.

उत्तरप्रदेश हाथसार येथे दलित मुलीवर झालेल्या बलात्कार प्रकरणी देशभरात जोरदार चर्चा झाली होती. या प्रकरणातील पीडित मुलीने मंगळवारी दिल्लीच्या सफदरजंग येथील रुग्णालयात उपचारादरम्यान अखेरचा श्वास घेतला. पीडित मुलगी सफरगंज येथील रुगालयात उपचार घेत होती. मात्र अखेर तिची झुंड संपली.

या पीडित मुलीच्या बलात्कार प्रकरणी आता उत्तरप्रदेशमध्ये वातावरण चांगलेच चिघळलेले आहे. सदर आरोपींना कठोरातील कठोर शिक्षेची मागणी संतप्त नागरिकांकडून होत आहे. या प्रकरणामध्ये पोलिसांच्या भूमिकेबद्दलही संक्षय व्यक्त केला जात आहे. यावरुनच आता काँग्रेसने उत्तर प्रदेश पोलीस आणि राज्यामध्ये सत्तेत असणाऱ्या भाजपा सरकारवर टीका केली आहे. भाजपाचे हे सरकार असे क्रूर का आहे?, असा प्रश्न काँग्रसने ट्विटरवरुन उपस्थित केला आहे.

उत्तर प्रदेशमधील १९ वर्षीय दलित मुलीवर सामूहिक बलात्कार करुन तिची क्रूर हत्या करण्यात आली असून, यावरुन पोलीस व्यवस्थेचा खोटारडेपणा उघड होत आहे. उत्तर प्रदेशमध्ये महिला, मुली असुरक्षित आहेत. उत्तर प्रदेश सरकार कारवाईच्या नावाखाली केवळ स्वत:चा बचाव करत आरोपींना संरक्षण देते, असं काँग्रेसने म्हटलं आहे.

काँग्रेसने पोस्ट केलेल्या फोटोमध्ये उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राजीनामा द्यावी अशी मागणी केली आहे. १० दिवस कोणालाही अटक करण्यात आली नाही, पीडितेच्या कुटुंबाला अंत्यसंस्कारामध्ये सहभागी होऊ दिले नाही, उत्तर प्रदेश पोलिसांनी कुटुंबाच्या परवानगीशिवाय पार्थिव ताब्यात घेत अंत्यसंस्कार केले असे तीन मुद्दे मांडत भाजपाचे हे सरकार असे क्रूर का आहे?, असा प्रश्न काँग्रेसने उपस्थित केलाय.

Leave a comment

0.0/5